ताज्या घडामोडी

पिंपरीत घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट पाचजण जखमी


संतोष अडसुळ,                                                                प्रतिनिधी पिं.चिं.

पिंपरी-चिंचवड : दि.21/8/24 (बुधवार) पिंपरीतील बौद्धनगर घरगुती गॅसचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे.स्फोटामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी पिंपरीच्या बौद्ध नगरमध्ये पहाटे 5: 30 च्या सुमारास घडली असुन स्फोटामध्ये होरपळलेल्या पाच ही रुग्णांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,घटनेमधील काही रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Advertisement

स्फोटामध्ये जखमी झालेले मनोज कुमार (वय 20), धीरज कुमार (वय 23), गोविंद राम (वय 27), राम चेलाराम (वय 40), सत्येंदर राम (वय 32, सर्व रा. बौद्धनगर, बिल्डींग नं. 16 च्या मागे, पिंपरी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सदर घटना ही पहाटे 5:30 वाजता घडली असून कुटुंबातील एका सदस्याने गॅस चालु केला असता अचानक हा स्फोट झाला कुटुंबातील बाकीचे लोक झोपेत असल्याने ते सर्वजण आगीत होरपळून गेले. तसेच घरातील काही महत्वाची कागदपत्रे,टिव्ही,फ्रीज,कपडे, बिछाना वगैरे जळून खाक झाले आहे.

 

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!