श्री क्षेत्र वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टला “सामाजिक बांधिलकीसाठी” २०२५ चा विशेष कार्यगौरव पुरस्कार प्रदान
संकेत बोरकर,
सासवड.
पुरंदर : छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त देण्यात येणारा विशेष कार्यगौरव पुरस्कार २०२५ श्री क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टला देण्यात आला. पुरंदर किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवामध्ये पुरंदर प्रतिष्ठान व सर्व शिवशंभु भक्त महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या शासकीय क्रार्यक्रमामध्ये “सामाजिक बांधिलकीसाठी” विशेष कार्यगौरव पुरस्कार श्री क्षेत्र वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सल्लागार यांना सांस्कृतिक कार्यमंत्री अशिष शेलार, कॅबिनेट मंत्री उदय सामंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे यांच्या हस्ते व हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत सम्मानित करण्यात आले.
श्री क्षेत्र वीर मस्कोबा देवस्थान ट्रस्टचे राजेंद्र धुमाळ यांनी सांगितले की धार्मिक कार्यक्रम तसेच अनेक समाज उपयोगी उपक्रम देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात येतात तसेच रुढी, परंपरा कायम जतन करण्याचा प्रयत्न केला जातो, अनेक विकासकामे व भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा देवस्थान ट्रस्टचा प्रयत्न असतो. यासाठी श्रीनाथभक्त, मानकरी, दागिनदार, सेवेकरी यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले असल्याने हा सन्मान मिळाला असल्याचे ते म्हणत होते तसेच देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून समजोपयोगी उपक्रम राबवत राहणार राहु, यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजेंद धुमाळ व अमोल धुमाळ सर्व विश्वस्त मंडळ व सल्लागार मंडळ उपस्थित होते.




