ताज्या घडामोडी

राजगड (वेल्हा) तालुक्यात शिवसेना (ठाकरे गट) कडून उमेदवार जाहीर ! महिलांना आणि युवाशक्तीला प्राधान्य


 

राजगड (वेल्हा) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड (वेल्हा) तालुक्यात शिवसेना (ठाकरे गट) कडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, या घोषणेमुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या यादीत महिला नेतृत्व आणि तरुण कार्यकर्त्यांना विशेष प्राधान्य देऊन पक्षाने नव्या राजकीय समीकरणांना चालना दिली आहे.

Advertisement

पक्ष नेतृत्वाने तालुक्यातील मजबूत घराण्यांतील महिला सदस्यांना मैदानात उतरवून ‘महिला सक्षमीकरणा’चा ठोस संदेश दिला आहे. पानशेत गणातून माजी तालुका प्रमुख दत्ता जागडे यांच्या सुनबाई अंजली केदार जागडे यांना उमेदवारी मिळाली आहे, तर याच गणातील दुसऱ्या जागेसाठी माजी तालुका प्रमुख राजेश निवगुने यांच्या पत्नी मनीषा राजेश निवगुने यांना पक्षाने संधी दिली आहे. वेल्हा बुद्रुक गणात युवासेना तालुका प्रमुख अनिल पारठे यांच्या वहिनी वैशाली विशाल पारठे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे पक्षाने युवती नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.

याशिवाय, वांगणी गणातून शिवसेना तालुका प्रमुख आणि जुने कार्यकर्ते उमेश काळूराम नलावडे यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. विंझर गणातून उपतालुका प्रमुख गोपीनाथ राणवडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद वांगणी गटातून उपजिल्हा प्रमुख शैलेश अनंतराव वालगुडे हे प्रमुख चेहेरे म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!