ताज्या घडामोडी

पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी तर सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांची नियुक्ती ; डॉ.सुहास दिवसेंचे प्रमोशन


पुणे : बोगस प्रमाणपत्राचा वापर करुन IAS पदावर विराजमान झालेल्या माजी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले होते. मात्र, दिवसे यांनी हे सर्व आरोप फेटाळत पूजा खेडकर यांचा बनाव असल्याचे म्हणत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणामुळे चर्चेत आलेले डॉ. सुहास दिवसेची पदोन्नती करत अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे,

साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुण्याच्या जिल्हा अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, पुणे या पदावर केली असुन आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार डॉ. दिवसे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे सचिव व्ही. राधा यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

Advertisement

पुण्यातील जिल्हा परिषद CEO संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, जिल्हाधिकारी, सातारा या पदावर श्री. जितेंद्र डूडी, भाप्रसे यांच्या जागी केली आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे बदली आदेश पारीत करण्यात आले आहेत.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!