भोरमध्ये आरपीआयचा भव्य मेळावा संप्पन ! अनेक युवकांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढली
भोर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भोर तालुक्याच्या वतीने आयोजित भव्य मेळावा व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम उत्साहात पार पडला. गंगुताई वाचनालय हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक युवकांनी पक्षात जाहीर प्रवेश करून संघटन बळकटीसाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाला आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे प्रमुख उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटन विस्ताराच्या दृष्टीने अक्षय गायकवाड यांची भोर तालुका कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
यावेळी भोर तालुका जिंगर ग्रुपच्या वतीने भीमगीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक न्याय, युवकांचे संघटन आणि पक्षाची आगामी वाटचाल यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमानंतर भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, युवक अध्यक्ष स्वप्नील सावंत, गणेश साळुंके, अमोल भालेराव, श्रीकांत जाधव, डॉ. राजेश धिवार, शंकर चौधरी, रंजीत रणखांबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




