भोर-राजगड-मुळशीसाठी वाढीव निधी द्या : आमदार शंकर मांडेकर
पुणे : जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत भोर-राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघासाठी पाणीपुरवठा, रस्ते, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक व्यवस्थेसाठी वाढीव निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली.
जलजीवन मिशन अंतर्गत भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील अनेक योजना अपूर्ण असून, काही ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचा मुद्दा आमदार मांडेकर यांनी उपस्थित केला. तसेच झालेल्या कामांची चौकशी करून उर्वरित कामांसाठी तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुळशीतील श्री वाघजाई देवी देवस्थान, राजगडमधील ध्यान्येश्वर देवस्थान, भोरमधील अमृतेश्वर मंदिर आणि भोरेश्वर देवस्थान यांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याची मागणीही या वेळी करण्यात आली.
डोंगरी व दुर्गम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांवर वीजपुरवठा नसून अनेक विद्युत खांब जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे महावितरणला वाढीव निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत आणि १०८ रुग्णवाहिका सेवा प्रभावी करावी, अशी मागणीही करण्यात आली.
भोर व राजगड येथे नवीन क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी द्यावा, मुळशीतील क्रीडा संकुलासाठी वाढीव निधी मंजूर करावा, तसेच वीर बाजी पासलकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार मांडेकर यांनी केली.
हिंजवडी, मारुंजी, घोटावडे, भूगाव आणि सुस परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत, तसेच सुस-सनी वर्ल्ड रस्त्यासाठी वन विभागाची परवानगी तातडीने द्यावी, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली.
दैनिक पेपर करिता सर्वोत्कृष्ट हेडलाईन्स व 270 शब्दात उत्कृष्ट दर्जाची बातमी तयार करून द्या विनंती




