ताज्या घडामोडी

२४ वर्ष फरारी खुन्याला जंगलातून पकडले ! वेल्हे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी


वेल्हा : बाबुराव रामभाऊ मरगळे आंबेगाव खुर्द ता. राजगड जि. पुणे यांच्या क्रूर खूनप्रकरणी २४ वर्षे फरारी असलेला मुख्य आरोपी हिन्या ऊर्फ हिरामण शिवराम पवार (वय ४३, रा. कारकतवाडी, ता. महाड, जि. रायगड) याला वेल्हे पोलिसांनी गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री महाडच्या गुंफेच्या जंगलातून अटक केली. पोलिसांनी वेश बदलून तीन किलोमीटर पायी डोंगर चढत आरोपीचा शोध घेतला आणि शिताफीने पकडले.

सदर खून २४ नोव्हेंबर २००२ रोजी घडला होता. त्यानंतर आरोपी महाड तालुक्यातील बारंगी, निजामपूर, छत्री, वाळण परिसरातील डोंगरदन्यात लपला. मोबाइल न वापरता, ओळख लपवण्यासाठी वेश-नाव बदलून लाकूडतोड व्यापाऱ्याच्या टोळीत काम करत होता. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नसल्याने शोध कठीण झाला होता.

Advertisement

पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पोलीस निरीक्षक अमित देशमुख, सहाय्यक फौजदार प्रदोष कुदळे व पोहा सोमेश राऊत यांच्या पथकाने वेश बदलून जंगलात शिरले. आरोपीला लाकूड व्यापारी म्हणून विश्वासात घेतला, पण संशय आल्यावर तो पळाला. पाठलाग करून अटक केली. न्यायालयाने २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कामगिरी पोलिसांच्या अथक मेहनतीचे उदाहरण आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!