राजकीय

भोर तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष


भोर : जिल्हा परिषद ४ गट व पंचायत समिती ८ गण  निश्चित झाले असल्याने तसेच अंतिम गट – गण रचना प्रसिद्ध झाल्याने भोर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्व इच्छुक उमेदवारांचे आता आरक्षण सोडती कडे लक्ष लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सूत्रानुसार काही गट व गण  आरक्षित होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण कधी निश्चित होतय यासाठी इच्छुक उमेवार देव पाण्यात घालून बसले आहेत.

आरक्षणाच्या अंतिम घोषणेची अद्याप प्रतीक्षा असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणे टाळले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य होण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. या बैठकीत स्थानिक पातळीवरील मतदार संघटन बळकट करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. इच्छुकांनी निवडणुकीची पुर्ण तयारी सुरू केली असून अंदाज बांधत कार्यकर्त्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

भोर तालुक्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी निवडणूक होणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार हे निश्चित झाले नसल्याने  इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी करताना विशेष काळजी घेतली जात आहे. पक्ष चिन्हांचा वापर न करता बॅनरबाजी करत आपण निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचा एक प्रकारे संदेश दिला जात आहे. दरम्यान युती आणि आघाडी झाली तर आपल्याला कोणाकडून संधी मिळेल याची चाचपणी केली जात आहे.

भोर तालुक्यात महाविकास आघाडीपेक्षा महायुतीकडे इच्छुकांचा अधिक कल असल्याचे दिसत आहे. काही इच्छुक उमेदवार उमेदवारी कोणाकडे मागावी कोठे प्रयत्न करावेत तसेच आपल्यासाठी दुसरा पर्याय काय असु शकतो यावर विचार करत असताना आरक्षण हा मोठा अडथळा त्यांच्या समोर आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!