ताज्या घडामोडी

राष्ट्रपतींना पुरंदर विमानतळ ग्रस्तांनी केला पत्र व्यवहार


ऋषिकेश जगताप,
सासवड.

सासवड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुरंदर विमानतळ विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र लिहले असुन पत्रामध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या रक्षणकर्ता आहात, देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर विराजमान असल्याने, आम्ही पुरंदर तालुक्यातील सामान्य शेतकरी, महिला, तरुण व नागरिक आमच्या वेदना आणि व्यथा थेट आपल्यासमोर मांडत आहोत. गेल्या १० वर्षांपासून आम्ही शांततामय आणि घटनात्मक मार्गाने पुरंदर विमानतळ प्रकल्पाचा सातत्याने विरोध करत आहोत. तरी आम्हाला कोणाकडून याबाबत मदत अथवा कोठला न्याय मिळू शकला नाही.

Advertisement

५ फेब्रुवारी २०१८ रोजी आम्ही शेतकऱ्यांनी मिळुन तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्व:इच्छा मृत्यूची परवानगी द्यावी अशा तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र पाठवले होते, परंतु आजपर्यंत त्याला कुठलेही प्रकारे उत्तर मिळाले नाही. आजही आम्ही भारतीय नागरिक असूनही आपल्या देशातच आमच्या न्यायासाठी केलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

आमची ही लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही. आमची ही लढाई आहे, आमच्या भूमी अधिकारांची लोकशाहीच्या रक्षणाची आणि भारतीय राज्यघटनेतील वचनांच्या सन्मानाची, राज्यघटना वाचवा, लोकशाही वाचवा, पुरंदर वाचवा, अशी मागणी करत आपण एक जबाबदार घटनात्मक पालक म्हणून आमच्यावर होणाऱ्या अन्यायविरुद्ध विरोधात आमची बाजु समजुन आम्हास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत ही नम्र विनंती.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!