राष्ट्रीय महामार्ग ४८ हरिश्चंद्री (कापूरहोळ) येथे वाहनांच्या लांबच-लांब रांगा
राम पाचकाळे,
हरिश्चंद्री- कापूरहोळ.
कापूरहोळ : सोमवार दि. १९ राष्ट्रीय महामार्ग ४८ लगत असणाऱ्या भोर तालुक्यातील हरिश्चंद्री (कापूरहोळ) गावातील लोकांना रस्त्याच्या दोन्ही बाजुस येण्याजण्यासाठी ब्रिजचे काम चालु आहे, ब्रिजच्या कामासाठी रस्ता उकरला असल्याने महामार्गाच्या दोन लेन चालु होत्या दोन दिवस होणाऱ्या पावसामुळे व खोद कामामुळे स्त्याला भेगा पडल्या आहेत त्यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. तसेच, काही ठिकाणी पाणी साचल्यामुळेही वाहतूक विस्कळीत झाली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर हरिश्चंद्र गावाच्या हद्दीत एका वळणावर महामार्ग खचला आहे आणि लांबच्या लांब भेगा पडल्या आहेत. पावसाने या भेगा रुंद झाल्या आहेत,यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग अरुंद स्थितीत फक्त एक लेन जाण्यासाठी चालु राहिल्यामुळे मोठ्यप्रमाणावर वाहनांची गर्दी होऊन ट्रॅफिक जॅम झाले असून सारोळा महामार्गाचे पोलीस अधिकारी कर्मचारी हे मोठ्या कसोटीने वाहनांना मार्ग दाखवत ट्रॅफिक सुरळीत करीत आहेत.




