महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ; पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा मान भोर तालुक्याला
नसरापूर – कर्जत जामखेड येथे होणाऱ्या 66 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व तालीम संघ पुणे जिल्हा यांच्यावतीने तालीम संघ भोर तालुक्याच्या सहकार्याने पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी 8 व 9 मार्च रोजी नसरापूर, ता. भोर येथे आयोजन करण्यात आले आहे. या निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन पुणे तालीम संघाचे अध्यक्ष अमोल बुचडे यांनी केले आहे.
या निवड चाचणीतून जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडला जाणार असून हा संघ कर्जत मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या 66 या स्पर्धेसाठी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंयपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 मध्ये सहभागी होणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सदरची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 26 ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. जिल्हा निवड चाचणी नसरापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान सकाळी 9 वाजता प्रारंभ होणार आहे.
आमदार शंकर मांडेकर, भालचंद्र जगताप (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक) पै.अमोल बुचडे (अध्यक्ष- पुणे जिल्हा तालीम संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली केळवडे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मा. उपाध्यक्ष पै.स्वप्निल वसंत कोंडे यांनी या निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागात 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो आणि कुमार गट गादी व माती 41-45,48,51,55,60,65,71,80,92,110. कुमार गटासाठी 2007,2008 अशा 2 वर्षाच्या जन्मतारखा ग्राह्य धरल्या जातील 2009 जन्मतारीख असलेल्यांना फिटनेस मेडिकल सर्टिफिकेट गरजेचे आहे, आधार कार्ड आणि पासपोर्ट हे पुरावे जन्म तारखे सोबत ग्राह्य धरले जातील. महाराष्ट्र केसरी ओपन गटात पार पडणार आहे. सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत नोंदणी होईल आणि त्यानंतर कुस्त्यांना प्रारंभ होणार आहे.
पुणे जिल्हा हिंदकेसरी किताब स्वर्गीय पै. विक्रम शिवाजी पारखी (कुमार महाराष्ट्र केसरी) यांच्या स्मरणार्थ श्री सागर शितोळे व श्री स्वप्निल केमसे यांच्याकडून मानाची गदा. पुणे जिल्हा कुमार केसरी किताब स्वर्गीय पै.अक्षय कोंडे यांच्या स्मरणार्थ पै.संतोष कोंडे व सागर कोंडे यांच्याकडून मानाची गदा. तसेच प्रत्येक वजनी गटातील प्रथम क्रमांकास स्पोर्ट्स सायकल,अशी बक्षिसे आहेत, स्पर्धा 2 दिवस चालणारा असल्याने येणाऱ्या पैलवानांची राहण्याची व खाण्यापिण्याची सोय करण्यात आलेली आहे, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पै.अमोल बुचडे ( अध्यक्ष-पुणे जिल्हा तालिम संघ),भालचंद जगताप (पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक), प्रशांत दानवले (अध्यक्ष-भोर तालीम संघ) लालू आप्पा कोंडे, तेजस पायगुडे, पै.शंभू कोंडे, शशिकांत शिंदे, अभिषेक खोपडे, राजेंद्र सोनवणे व पै. स्वप्निल कोंडे मित्र परिवार परिश्रम घेत आहेत.




