ससेवाडीतील गुरुदत्त सी.एन.सी. कंपनीत 2 लाख 36 हजार रुपयांच्या मालाची चोरी
वेळु : ससेवाडी,ता.भोर येथील गुरुदत्त सी.एन.सी. कंपनी मधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 2 लाख 36 हजार 190 रुपये किंमतीच्या मालाची चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रविण चंद्रकांत जगताप (वय 48 वर्षे, रा. कर्वेनगर, पुणे) यांनी आज शुक्रवारी (दि. 19 जुलै) सायंकाळी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Advertisement
अज्ञात चोरट्याने दिनांक 16/07/2024 रोजी 00.30 ते 02.30 वा चे दरम्यान गुरूदत्त सी.एन.सी कंपनीच्या स्टोअर रूम ची दक्षिण बाजुची खिडकीचे ग्रील कापुन स्टोअर रूम मधे प्रवेश करून स्टोअर रूम मधुन चोरीच्या उद्देशाने स्वतःच्या फायदया करीता कंपनीमधील किंमत 23,36,190 रुपयाच्या वस्तु चोरून नेलेल्या आहेत. राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.
Advertisement




