एक्टिवा आणि डंपरच्या अपघातात एक महिला ठार
भोर : शिवरे गावच्या हद्दीत तृप्ती हॉटेलच्या समोर महेश बाळू साठे, वय 28, व्यवसाय नोकरी, सध्या रा. फुस्सुंगी पावर हाउस शेजारी गजानन नगर, गल्ली नं.1, फुस्संगी, ता. हवेली, जि. पुणे, मूळ गाव बांबवडे, कुस्ती मैदान शेजारी, ता. पलूस, जि. सांगली, यांनी अज्ञात डंपर चालक आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी व फिर्यादीची पत्नी सोनाली महेश साठे, वय 23, आज ता. 09/05/2024 रोजी सकाळी 09/10 वा. सुमारास मौजे शिवरे गांवचे हदीत हॉटेल तृप्तीचे समोर एक्टिवा मोटार सायकल नं. MH-10 DU-7559 असे पुणे बाजू कडून सातारा बाजूकडे जात असताना पाठीमागून डंपर नंबर MH-12 VT-8689 वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करुन, अविचाराने, निष्काळजीपणे, डंपर चालवुन येवून त्याने फिर्यादीच्या एक्टिवा मोटार सायकलला जोराने पाठीमागून ठोस देवून अपघात करुन अपघाताची कोणतीही खबर न देता डंपर घेऊन पळुन गेला.
अपघातामध्ये फिर्यादीच्या पत्नीस लहान मोठ्या गंभीर जखमा होवून तिच्या मृत्यूस कारणीभूत होवून तो माणुसकी म्हणुन किंव्हा याअपघातास जबाबदार असतानाही घटना स्थळाहुन पळुन गेला, यामध्ये फिर्यादीसही उजवे गुडघ्याला तसेच तोंडावर उजवे बाजूला किरकोळ जखमा झाल्या आहेत, डंपर नंबर MH-12 VT-8689 वरील अज्ञात चालक डंपर घेवून पळून गेला आहे. म्हणुन त्याने डंपर चालका विरुध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे.
अज्ञात आरोपी विरोधात 220/24 भादवि 304 अ, 279,337,338,427, मो.वा.का.क. 184,134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलीस ठाणेचे अंमलदार पो ना कोंढाळकर ब नं 1144, तपासी अंमलदार सहा.फौज चव्हाण, प्रभारी अधिकारी पो. नि. गवळी सो. अधिक तपास करत आहेत.




