किरण दगडे पाटील यांच्या कापूरहोळ येथील कार्यालयात दिवाळी फराळ साहित्य कुपन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
भोर : – किरण दगडे पाटील युवा मंचचा अनोखा उपक्रमा अंतर्गत दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारे साहित्याचे कुपन घेण्यासाठी नागरिकांनी लांबच लांब रांग लावली आहे, साहित्य घेण्यासाठी झालेली गर्दी लक्षात घेता नागरिकांना महागाईचा किती मोठा फटका बसत असेल याचे चित्र दिसत आहे. हे पाहुन भोर तालुक्यातील महिला भगिनींनी आयोजकांच्या कामाची स्तुती केली.
दिवाळी तोंडावर असल्याने गोर गरिबांना देखील या दिवाळीचा गोडवा चाखता यावा यासाठी किरण दगडे पाटील युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. भोर विधानसभेतील प्रत्येक गोर गरिब कुटुंबियांना बाजारातील महागडे फराळ तयार करण्याचे साहित्य विकत घेण्याची गरज पडू नये, यासाठी किरण दगडे पाटील यांचे कार्यकर्ते कष्ट घेत आहेत, काही महिलांनी साहित्य वाटप कुपन संपेल या भितीने सकाळ पासुन रांग लावली आहे.
किरण दगडे पाटील युवा मंच अध्यक्ष योगेश शेलार यांनी स्वराज महाराष्ट्र न्यूज़शी बोलताना दिवाळी फराळ साहित्य वाटपाचे कुपन आज पासुन दि. 26 ते 30 तारखेपर्यंत सकाळी – 10 ते संध्याकाळी – 5 वाजेपर्यंत वाटप करण्यात येणार असुन जास्तीत-जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान केले आहे.




