SWARAJ MAHARASHTRA NEWS

पुणे-सातारा महामार्गावर क्रूरतेचा कळस ! पाय बांधलेल्या रक्तबंबाळ घोरपडीला सर्पमित्रांनी दिले जीवदान
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथील फ्लायओव्हरजवळ मागील दोन्ही पाय बांधलेल्या आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या घोरपडीला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. पुणे जिल्हा वन्य प्राणी सर्प रक्षक असोसिएशनच्या सदस्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे आणि वनविभागाच्या सहकार्यामुळे या दुर्मिळ वन्यजीवाची सुरक्षित सुटका करून तिला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

घोरपड जखमी अवस्थेत पडल्याची माहिती बाबू वाल्हेकर यांनी सर्पमित्र विलास धोंगडे यांना दिली. माहिती मिळताच धोंगडे यांनी सहकारी श्रीकांत खेडकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान घोरपडीचे मागील दोन्ही पाय घट्ट बांधलेले असून त्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याचे निदर्शनास आले. सर्पमित्रांनी अत्यंत काळजीपूर्वक घोरपडीची सुटका करून तिच्यावर प्राथमिक उपचार केले.

यानंतर संस्थेचे अध्यक्ष सुशील विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी गुट्टे व वनरक्षक ससाणे यांनी घोरपडीला ताब्यात घेत सुरक्षित वनक्षेत्रात मुक्त केले.

या बचावकार्यात सहभागी सर्पमित्रांचे वनविभागाने कौतुक केले. वनक्षेत्रपाल वसंत चव्हाण यांनी वन्यजीव संरक्षणासाठी स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तर सुशील विभुते यांनी नागरिकांनी वन्यप्राण्यांना इजा न करता तत्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. वन्यजीव संवर्धनासाठी नागरिक, सर्पमित्र आणि वनविभाग यांचा समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

The post पुणे-सातारा महामार्गावर क्रूरतेचा कळस ! पाय बांधलेल्या रक्तबंबाळ घोरपडीला सर्पमित्रांनी दिले जीवदान appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

आंतरजातीय विवाहानंतर पुण्यात थरार ! तरुणी व पतीचे कथित अपहरण !! खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी केली सुटका
खेडशिवापूर : सोशल मीडियावरील ओळखीचे प्रेमात आणि त्यानंतर आंतरजातीय विवाहात रूपांतर झाल्यानंतर पुण्यात घडलेल्या कथित अपहरणाच्या घटनेने खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता विवाह केलेल्या २३ वर्षीय तरुणीला आणि तिच्या २८ वर्षीय पतीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्पर कारवाई करत खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ जोडप्याची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील असून ती चेन्नई येथे राहत होती. तरुणही उत्तर प्रदेशातील असून सुतारकामाचा व्यवसाय करतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. कुटुंबीयांचा विवाहाला विरोध असल्याने तरुणी सुमारे दहा दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. त्यानंतर दोघांनी कायदेशीर पद्धतीने विवाह केला.

दरम्यान, मुलीचा शोध घेत तिचे वडील, एक नातेवाईक आणि तामिळनाडू पोलीस दलातील एक कॉन्स्टेबल पुण्यात आले. सोमवारी रात्री आंबेगाव पठार परिसरात त्यांनी जोडप्याला बोलावून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांचे हात-पाय बांधून जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्यात आले, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

अपहरणकर्ते जोडप्याला म्हाळुंगे येथील एका लॉजमध्ये घेऊन गेल्याचे समोर आले. तेथून ते साताऱ्याच्या दिशेने निघाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ कार अडवली आणि जोडप्याची सुखरूप सुटका केली.

या प्रकरणी तरुणीचे वडील, त्यांचा नातेवाईक तसेच चेन्नई पोलीस दलातील कॉन्स्टेबल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

The post आंतरजातीय विवाहानंतर पुण्यात थरार ! तरुणी व पतीचे कथित अपहरण !! खेड-शिवापूर टोलनाक्यावर पोलिसांनी केली सुटका appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मनोज गायकवाड यांची बिनविरोध निवड ! महाराष्ट्र कारागृह पोलीस अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून संधी
पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सन २०२६-३१ पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कारागृह पोलीस अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मनोज हनुमंत गायकवाड यांची संस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे संस्थेच्या सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गायकवाड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संचालक मंडळातील पदाधिकारी, सदस्य व सभासदांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी मनोज गायकवाड यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदार प्रतिनिधी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

सभेला व्हाईस चेअरमन अतुल पटेकर, सचिव भरत बंडगर, सहसचिव योगेश पाटील, तज्ज्ञ संचालक उमेश देशमुख तसेच संचालक प्रमोद जाणगाव, प्रमोद इंगळे, साहेबराव वालुंजुले, दौलत खिलारे, गजानन शिंदे, संचालिका प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ व अर्चना सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. गायकवाड यांच्या निवडीमुळे संस्थेचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

The post पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मनोज गायकवाड यांची बिनविरोध निवड ! महाराष्ट्र कारागृह पोलीस अधिकारी-कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मतदार प्रतिनिधी म्हणून संधी appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

काळेवाडीत वीज वितरणाच्या डीपीवर चोरट्यांचा डल्ला ! 80 किलो कॉपर कॉईल लंपास
कापूरहोळ : भोर तालुक्यातील काळेवाडी येथे वीज वितरणाच्या डीपीवरील ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील कॉपर कॉईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे काळेवाडी येथील दत्तात्रय जाधव यांच्या शेतामध्ये बसविण्यात आलेल्या 100 केव्ही क्षमतेच्या डीपीला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील ऑईल सांडवले तसेच ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे 80 किलो वजनाची कॉपर कॉईल चोरी करून नेली. चोरीस गेलेल्या मालाची अंदाजे किंमत 30 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी तेजस दत्तात्रय बादाडे (रा. पिसावरे, ता. भोर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 344/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 324(4) व वीज कायदा कलम 136 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.

The post काळेवाडीत वीज वितरणाच्या डीपीवर चोरट्यांचा डल्ला ! 80 किलो कॉपर कॉईल लंपास appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून ! आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक !! माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
अजित कोंढरे,

प्रतिनिधी.

बारामती : बारामती तालुक्यातील पणदरे एमआयडीसी परिसरात ३० वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणाचा माळेगाव पोलिसांनी अवघ्या दोन तासांत उलगडा करत गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पणदरे) याला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव वैशाली तानाजी पवार (वय ३०) असे असून, त्यांच्या सासू रंजना लक्ष्मण पवार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी शेजाऱ्यांनी वैशाली यांच्या पतीबाबत माहिती दिल्यानंतर रंजना पवार घरी गेल्या असता वैशाली या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

घटनास्थळाची पाहणी व परिसरातील चौकशीनंतर पोलिसांनी गणेश माने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासात आरोपीने महिलेवर हातोड्याने हल्ला करून अत्याचार केला व नंतर टॉवेलने गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे.

शवविच्छेदन अहवालात डोक्यावर, मानेवर आणि गुप्तांगावर गंभीर जखमा आढळल्या असून मृत महिला गर्भवती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आरोपीकडून हातोडा, कपडे व चोरीचे दागिने जप्त करण्यात आले असून न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

The post गर्भवती महिलेवर अत्याचार करून खून ! आरोपीला अवघ्या दोन तासांत अटक !! माळेगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

प्रेमसंबंधातील तणावातून तरुणाची आत्महत्येची धक्कादायक घटना ! उपचारादरम्यान मृत्यू
अजित कोंढरे,

प्रतिनिधी.

बारामती : बारामती येथे स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय अविष्कार अमोल ढोले याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी मृत्यू झाला. या घटनेमुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

अविष्कार ढोले हा मूळचा कुरवली (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील रहिवासी होता. शिक्षणासाठी तो बारामती शहरातील सूर्यनगरी परिसरातील जयश्री अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. शनिवारी (दि. १२) दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली.

घटनेनंतर त्याला तातडीने बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते.

दरम्यान, मूळ गावी एका महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला मिळाल्यानंतर अविष्कार मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती सुजित रवी घोडके (वय १९) यांनी पोलिसांना दिली. बारामती तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. पिस्तुलाचा स्रोत व घटनेमागील सर्व बाबींचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.

The post प्रेमसंबंधातील तणावातून तरुणाची आत्महत्येची धक्कादायक घटना ! उपचारादरम्यान मृत्यू appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

भोर-शिरवळ मार्गावर संशयास्पद मृत्यू ! राजेवाडी हद्दीत तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ !! खून की अपघात याचा शोध सुरू
भोर : भोर–शिरवळ मार्गावरील राजेवाडी गावाजवळ एका तरुण महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या वळणाशेजारी असलेल्या झाडाझुडपात हा मृतदेह आढळल्याने घटनेबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव–राजेवाडी हद्दीतील रस्त्याच्या वळणाजवळ स्थानिक नागरिकांना संशयास्पद स्थितीत महिलेचा मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती तत्काळ शिरवळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा तसेच अन्य आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.

प्राथमिक तपासात संबंधित महिलेचा खून करून मृतदेह या ठिकाणी आणून टाकण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, हा प्रकार अपघाती मृत्यूचा आहे की खुनाचा, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

The post भोर-शिरवळ मार्गावर संशयास्पद मृत्यू ! राजेवाडी हद्दीत तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ !! खून की अपघात याचा शोध सुरू appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

खोपीत बिबट्याचा कहर ! दोन पाळीव व तीन भटक्या कुत्र्यांसह वासराचा फडशा !! शेतकऱ्यांत भीती
खेडशिवापुर : भोर तालुक्यातील खोपी परिसरात गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कालावधीत बिबट्याने तीन पाळीव व दोन भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडल्याची माहिती समोर आली असून, आता पशुधनावरही हल्ला झाल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खोपी येथील शेतकरी स्वप्नील डिंबळे यांच्या गायीच्या वासरावर रविवारी बिबट्याने हल्ला केला. वासराला जवळच्या शेतात ओढून नेल्यानंतर त्याला ठार करून काही भाग फस्त केला. सोमवारी सायंकाळी बिबट्या पुन्हा त्याच ठिकाणी आला आणि वासराचे उर्वरित अवशेषही घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती वाढली असून, शेतात काम करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्येही दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिक व पशुधनाची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

खोपीचे सरपंच तुषार कांबळे यांनी वन विभागाचे अधिकारी संदीप ससाणे यांना लेखी निवेदन देत परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

वन विभागाचे अधिकारी संदीप ससाणे यांनी घटनेची गंभीर दखल घेत परिसराची पाहणी केली. बिबट्याच्या पायांचे ठसे संकलित करण्यात आले असून, त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. ससाणे व त्यांचे सहकारी रात्रीच्या वेळी गस्त घालत असून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

The post खोपीत बिबट्याचा कहर ! दोन पाळीव व तीन भटक्या कुत्र्यांसह वासराचा फडशा !! शेतकऱ्यांत भीती appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

कापूरहोळमध्ये ‘हिट अँड रन’ ! सर्व्हिस रोडवर पाठीमागून धडक देऊन दुचाकीस्वार फरार !! राजगड पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गालगतच्या कापूरहोळ येथील सर्व्हिस रोडवर भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या अज्ञात दुचाकीने पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातानंतर जखमी नागरिकाला मदत न करता दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुदास रामचंद्र बरदाडे (वय ६४, रा. साळोबाचीवाडी, कापूरहोळ) हे ३ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कापूरहोळ चौकातून पायी घरी जात होते. पाटील हॉस्पिटलसमोरील पीएमटी बसथांब्याजवळ ते पोहोचले असता कापूरहोळकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघातात बरदाडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धडक एवढी जोरदार होती की ते रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर दुचाकीस्वाराने मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पलायन केले. जखमी बरदाडे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, फरार चालकाचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी गणेश भानुदास बरदाडे (वय ३६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार दुचाकीस्वाराचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.

The post कापूरहोळमध्ये ‘हिट अँड रन’ ! सर्व्हिस रोडवर पाठीमागून धडक देऊन दुचाकीस्वार फरार !! राजगड पोलिसांत अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.

जनसेवा बँक सासवड शाखेचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ! कर्जमंजुरी पत्रांचे वितरण !! मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन
सासवड : जनसेवा बँक सासवड शाखेचा ३४ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे, क्लस्टर हेड जाधव, उद्योजक डॉ. निनाद खळदकर, नाना झुरंगे, सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला शाखेचे ग्राहक, सभासद, आजी-माजी सेवक, स्थानिक नगरसेवक तसेच परिसरातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी शाखेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. गेल्या ३४ वर्षांतील शाखेच्या वाटचालीसह ग्राहकाभिमुख सेवा, आर्थिक विकासातील योगदान आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमात कर्जवाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. बाळासाहेब कामथे यांना ५० लाख रुपयांचे गृहकर्ज मंजुरीपत्र, सौ. शिर्के यांना ७ लाख रुपयांचे गृहकर्ज मंजुरीपत्र प्रदान करण्यात आले. तसेच भानुदास जगताप यांना ३० लाख रुपयांच्या कर्जाचे तत्त्वतः मंजुरीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

या सोहळ्यास सुमारे २५० ते ३०० खातेदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित ग्राहक, सभासद आणि हितचिंतकांचे आभार शाखा व्यवस्थापक दत्तात्रय गाडे यांनी मानले. शाखेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्यच प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

The post जनसेवा बँक सासवड शाखेचा ३४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ! कर्जमंजुरी पत्रांचे वितरण !! मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन appeared first on SWARAJ MAHARASHTRA NEWS.