भोर तालुक्यात आंबेडकरी समाजाच्या विकासकामांना विरोध करणाऱ्यांबाबत समाजात तीव्र नाराजी ! राजकीय व आर्थिक फायद्याकरिता केवळ चार व्यक्तींचा विरोध !! खोट्या केसची भीती वाटत नाही : अविनाश गायकवाड
भोर : भोर तालुक्यातील आंबेडकरी समाजाने प्रगती, शिक्षण आणि समाजहितासाठी नेहमीच योगदान दिले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथप्रेम व ज्ञानयज्ञाच्या प्रेरणेने तालुक्यात वाचनालय व अभ्यासिका उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. आमदार शंकर मांडेकर व भोर नगरपरिषदेच्या प्रयत्नाने प्रथमच २.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उत्तम सुविधा मिळेल, असा विश्वास आहे.
या निर्णयाचे आंबेडकरी समाजाने स्वागत केले असले तरी काही ठराविक चार व्यक्तींच्या चुकीच्या प्रचाराने संभ्रम निर्माण होत आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित वाचनालयाला विरोध करणे हे खेदजनक असून, राजकीय हेतूं की आर्थिक फायद्यासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत. हे नक्कीच समाज बांधवांच्या लक्षात आले आहे.
दिक्षाभूमी स्मारकाच्या गेटचे कुलूप तोडल्याचा आरोप पूर्णपणे निराधार आहे. आम्ही पाहणी करण्यासाठी गलो केला असता त्यावेळी त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी तसेच नगरपरिषदेचे सिओ व इतर अधिकारी उपस्थित होते, आम्ही गेट वरतीच भूमिपूजनाची पार्टी लावून तिथून निघून गेलो आम्ही निघून जाताना कुलूप व्यवस्थित होते, आम्ही निघून गेल्यानंतर कुलूप कोणी तोडले असावे हे एक प्रश्न चिन्हच आहे, खोटं बोला पण रेटून बोला या म्हणीप्रमाणे या चार व्यक्तींनी समाजामध्ये संभ्रम निर्माण केला, सदर इमारत व २४९ गटाचा मालकी हक्क भोर नगरपरिषदेकडे आहे व गेल्या १० वर्षांत समितीकडे हस्तांतर झालेले नाही. समितीची जबाबदारी होती, पण त्यात त्यांना अपयश आले.
कायदेशीर प्रक्रियेसाठी आमदार, मुख्याधिकारी व नगराध्यक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. खोट्या केसेसमुळे भीती वाटत नाही, समाजहितासाठी लढा सुरूच राहील. दिक्षाभूमी समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी विरोध केलेला नाही. केवळ चार व्यक्तींच्या विरोधाला समाजाचा विरोध म्हणणे चुकीचे आहे. समितीत संवादाचा अभाव असून, १० वर्षांनंतर पुनर्गठन व सर्व संघटनांचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे.
दिक्षाभूमी ही समाजाच्या अस्मितेचे प्रतीक असून, आमदार शंकर मांडेकर यांनी तिच्या पावित्र्याची हमी दिली. अभ्यासिका दिक्षाभूमीच्या बाजूच्या रिकाम्या जागेत उभारली जाईल. समाजहिताच्या या विकासकामांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तींना आंबेडकरी समाजाने तीव्र निषेध नोंदवला आहे.
या पत्रकार परिषदेच्या शेवटला अविनाश गायकवाड म्हटले की त्यांच्या पत्रकार परिषदेत दिक्षाभूमी समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव व इतर विद्यमान सदस्य समाजाच्या महत्त्वाच्या निर्णयासाठी का उपस्थित नव्हते, अजुन तरी विद्यमान अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव व इतर सदस्य यांनी स्पष्ट विरोध केलेला नाही, याचे ही या चार जणांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, त्यांच्या अशा वागण्यामुळे समाजातीलच बांधवांमध्ये तेढ निर्माण होत असून यावर दिक्षाभूमी समितीच्या विद्यमान अध्यक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे.
यावेळी अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, मयूर गायकवाड, सतीश गायकवाड, विशाल शाक्य, रोहित जगताप, युवराज शेलार, निलेश घोडेस्वार, तुषार गायकवाड, अक्षय गायकवाड, प्रितम गायकवाड त्यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.




