ताज्या घडामोडी

कारची काच फोडून महिलेच्या पर्ससह ८५०० रुपयांची चोरी


शिवापूर : पुणे जिल्ह्यातील शिवापूर बाग (श्रीरामनगर) तालुका हवेली येथे अनोळखी चोरट्याने कारमधून महिलेची गुलाबी पर्ससह ८५०० रुपयांची चोरी केली. राजगड पोलीस स्टेशनला नोंदलेल्या फिर्यादीनुसार, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:४५ ते ९:१५ या वेळेत कैलास भेळ येथे चोरट्याने कार MH-02-CW-0403 च्या ड्रायव्हर साइड मागील दरवाज्याची काच फोडून आत ठेवलेली पर्स लंपास केली.

Advertisement

फिर्यादी विकास पडळकर (वय ३६, आर्किटेक्ट, उल्हासनगर) यांनी सांगितले, “नाश्त्यासाठी कैलास भेळला गेलो होतो. गाडी पार्किंगमध्ये उभी केली होती. परत आल्यावर ड्रायव्हर साइडची काच तुटलेली आणि पर्स गायब दिसली.” पर्सची किंमत ५०० रुपये तर त्यात ५०० रुपयांच्या १६ नोटांसह ८००० रुपये रोख होते.

२४ फेब्रुवारी रोजी रात्रि ००:४९ वाजता गुन्हा क्र. ७९/२०२६ BNS कलम ३०३(२), ३२४(४) अंतर्गत नोंद झाली. पो.हवा प्रधान (मो.९०११०८१५५६), तपासी सफौ बरकाले (मो.९९२१५६७३२५) आणि प्रभारी पो.नि. गवळी (मो.७०२०८६३५५०) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!