ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात शिवसेनेसाठी ऐतिहासिक क्षण ! पहिल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


भोर : भोर तालुक्यात प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले. जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे आणि जिल्हा संघटक माऊली शिंदे यांच्या हस्ते या कार्यालयाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यानिमित्त नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भेगडे यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे वाटप करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देताना येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. “शिवसेना पुन्हा भोर तालुक्यातील सत्तेत येईल, असा आम्हाला विश्वास आहे,” असा निर्भयपणे त्यांनी सांगितले.

जिल्हा संघटक माऊली शिंदे यांनी वेळू नसरापूर गटातील तिन्ही उमेदवार निवडून आणणार असल्याचे घोषित करून उत्साह वाढवला. तसेच जनसंपर्क कार्यालय भोर तालुक्यातील शिवसैनिकांसाठी एक नवा आधारस्तंभ ठरणार असून, येत्या निवडणुकीत पक्षाच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advertisement

भोर तालुकाप्रमुख दशरथ गोळे यांनी प्रास्ताविक करताना भोर तालुका पंचायत समितीवर भगवा फडकविण्याचा विश्वास व्यक्त केला. युवा तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे आणि युवा नेते महेंद्र भोरडे यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. पश्चिम तालुकाप्रमुख भरत नाना साळुके यांनी सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाला माजी तालुकाप्रमुख अर्जुन चव्हाण, पूर्व तालुकाप्रमुख दशरथ गोळे, तालुकाप्रमुख पश्चिम भरत नाना साळुंके, कामगार सेना भोर तालुकाप्रमुख विजय भिलारे, युवा सेनाप्रमुख अनिकेत शिंदे, भोर शहरप्रमुख चंदन कोळसकर, समन्वयक शंकर दादा जाधव, मुळशी तालुका शिव सहकार सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, युवासेना प्रसिद्ध प्रमुख संदीप आमले, दादा देवकर, उपतालुका प्रमुख एकनाथ तावरे, निलेश मुजुमले, विभाग प्रमुख चंद्रकांत इंगुळकर, विकास बांदल, मा.उपतालुकाप्रमुख नारायण वीर, शाखाप्रमुख विलास गोळे, पंडित खाटपे, नथुराम दिघे, लक्ष्मण मस्के, वाटकर मामा, आकाश दानवले, शैलेश जाधव, ज्ञानोबा ढमाळ, दीपक धामुणसे, सागर कोंडे, राजेंद्र काटकर, केशव शेटे, सचिन चुनाडे, किरण पवार, केशव साळेकर, नथु राठवडे आणि इतर अनेक ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!