संधी दिल्यास वेळू-नसरापूर गटात ताकदीनं लढणार : पोपटराव सुके
नसरापूर : भोर-वेल्हा-मुळशीचे कार्यसम्राट मा.आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या जोरावर आणि सहकाऱ्यांच्या सोबतीनं वेळू-नसरापूर गटात गेली २० वर्षे जनतेशी घट्ट संपर्क ठेवल्याने यंदाही निवडणुकीच्या रिंगणात ताकदीनं उतरणार आहे असे राजगड साखर सहकारी साखर कारखान्याचे व्हॉईस चेअरमन पोपटराव सुके यांनी सांगितले.
पोपटराव सुके यांनी सांगितले की मागील निवडणुकीत वेळू-भोंगवली गटातून उमेदवारी देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, मात्र त्या अनुभवातून २० वर्षांच्या जनसंपर्कावर आधारित या वेळेस विजय निश्चित असल्याचा आपला विश्वास आहे. स्थानिकांशी दिवसागणिक वाढलेला जनसंपर्क, विकासाची दिशा आणि कार्यतत्परतेमुळे जनतेचा कौल आपल्यालाच मिळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.ते पुढे म्हणाले की संग्रामदादा थोपटे आणि भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी सदैव माझ्यावर दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. त्यामुळे वेळू-नसरापूर गटातील ही निवडणूक पक्षाच्यावतीनं लढविण्यास मी उत्सुक आहे. पक्षश्रेष्ठी आणि संग्रामदादा नक्कीच मला या मैदानात संधी देतील, असा मला विश्वास आहे.”
दोन दशकांपासून सुके हे वेळू-नसरापूर परिसरात सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने काम करत आहेत. राजगड साखर कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन तत्काळ उपाय केले असून, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.यंत्रनिर्माण पतसंस्था या उपक्रमातून अनेक तरुणांना उद्योग उभारण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळालं आहे. स्वावलंबी बनविण्याच्या या उपक्रमामुळे अनेक युवक आपल्या पायावर उभे राहिले आहेत.
तसेच नवसह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.क्रीडा क्षेत्रातही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी दाखविलेली कामगिरी स्थानिकांमध्ये उल्लेखनीय मानली जाते.“आजवर विकासकामे करताना जनतेचा विश्वास आणि साथ लाभली आहे. त्यामुळे या निवडणुकीत विजय निश्चित आहे. मा. आमदार संग्रामदादा थोपटे आणि पक्षश्रेष्ठी माझ्या कार्यावर निश्चित खूश असून मला ही संधी मिळेल अशी मला खात्री आहे,” असेही सुके यांनी शेवटी नमूद केले.




