पुण्यात स्कूल बस चालकाचे चार विद्यार्थिनींशी अश्लील वर्तन ; नराधम चालकावर गुन्हा दाखल
पुणे : पुण्यामध्ये स्कूल बस चालकाने बसमध्ये काही अल्पवयीन विद्यार्थिनीन सोबत अश्लील वर्तन केल्याचे संतापजनक घटना समोर आली आहे. तसेच याबाबत घरच्यांना काही सांगितले तर त्या विद्यार्थिनींना जीवे मारण्याची धमकी दिली, याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असुन आरोपी चालकाविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, चार विद्यार्थीनींशी गैरकृत्य करणाऱ्या या स्कूल बस चालकाला पतीत पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. पुणे शहराला काळीमा लावणारी घटना घडली आहे. बस चालकाने चार विद्यार्थीनींसोबत अश्लील कृत्य केल्यानंतर त्यांना याबाबत घरी सांगितलं तर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याने संबंधित या चारही विद्यार्थीनी खूपच घाबरल्या होत्या त्यामधील काही विद्यार्थिनी याबाबत घरी माहिती दिली असता त्या विद्यार्थिनींच्या पालकांनी शाळा ज्या परिसरात आहे तिथल्या नांदेड पोलीस ठाण्यात जाऊन नराधम चालका विरूद्ध गुन्हा दाखल करुन पोलिसांनी संबंधित बस चालकाला ताब्यातही घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.




