सामाजिक

पुणे चंदननगरमध्ये 20 एप्रिलला मोफत मराठा वधु-वर मेळावा ; मराठा सोयरीक संस्था व शिरुर तालुका मित्र परिवाराचा उपक्रम


सुरज चिखले,
प्रतिनिधी.

पुणे : मराठा सोयरीक संस्था व शिरूर तालुका मित्र परिवार पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातौल चंदननगर मध्ये मोफत ९७ वा मराठा वधू वर परिचय मेळावा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, हा मेळावा रविवार दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चंदननगर येथील जुन्या भाजी मंडईत पुणे महानगर  पालिकेच्या शाळेमधील हॉलमध्ये होणार आहे. तसेच पुढील ९८ वा मोफत मेळावा हा आळंदी शहरातील ज्ञानसागर मंगल कार्यालयामध्ये रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती शिरूर तालुका मित्र परिवाराचे अध्यक्ष बाळा पन्हाड व संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांनी दिली आहे.

Advertisement

हे सर्व मेळावे मोफत असून वधू-वरांनी आपल्या पालकांसोबत आधार कार्ड झेरॉक्स व बायोडाटा घेऊन येणे बंधनकारक आहे. पदवीधर, उच्चशिक्षित, अविवाहित, घटस्फोटीत, विधुर, विधवा यांच्यासाठी हा मेळावा आहे. मेळाव्यामध्ये विविध भागातील अनेक चांगली सुंदर स्थळे समक्ष बघायला मिळणार आहेत.

आतापर्यंत संस्थेमार्फत ४५०० लग्न जमले आहेत त्यातील ५५० लग्न हे एकल विधुर विधवा यांची जमली आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ७०२०२८१२८२ यावर करण्याचे आवाहन केले आहे. संस्थेची अहिल्यानगर, पुणे, नाशिक या तीन ठिकाणी शाखा आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!