जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये भोर तालुक्याची समीक्षा मळेकर प्रथम
खेड : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडघर तालुका भोर येथे शिक्षण घेत असलेली करंजगावची कन्या समीक्षा रामचंद्र मळेकर ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये पुणे जिल्हात प्रथम आली आहे, भोर तालुक्यातून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
खेड तालुकात यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत जिल्हा परिषद पुणे यांच्यामार्फत सन 2024 – 25 या वर्षातील जिल्हास्तरीय स्पर्धा श्री शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुल खेड येथे दिनांक 10 व 11 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी मोठा गट या गटात समीक्षा माळेकर हिने वृद्धाश्रम निर्माण होतात तेव्हा संवेदना समतात का ? याविषयावर बहुमूल्य विचार मांडले 13 तालुक्यातून आलेल्या स्पर्धकांमधून तिने सर्वांना प्रभावित करून आपल्या ऊगवत्या भाषेतून हा विषय जिवंत करण्याचा प्रयत्न केला, समाजात कमी होत चाललेली संवेदना आणि वृद्धापकाळत होणारे आई-वडिलांचे हाल यांचा जणू पाढाच तिने मांडला.
जिल्ह्यातील परीक्षकांनी तिचे कौतुक करून तिच्या वक्तृत्व शैलीचे व विषय मांडणीचे प्रथम क्रमांका करिता सर्वानुमते निवड करुन कौतुक केले, तिच्या या यशामध्ये तिचे वर्गशिक्षक श्री राजेंद्र किद्रे, तिचे वडील रामचंद्र मळेकर, शाळेमधील खुटवड मॅडम, शिंदे मॅडम, मुख्याध्यापक अशोक बांदल, आपटी केंद्राचे केंद्रप्रमुख अरविंद बडे सर, विस्तार अधिकारी पाटील मॅडम व भोर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे या सर्वाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, समीक्षा मळेकर हिला मिळालेल्या यशाबद्दल भोर तालुक्यासह हिरडस मावळ पंचक्रोशीतील नागरिकांकडून तिचे कौतुक होत आहे.




