विना शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार व निरोगी जीवनासाठी योग आवश्यक : हृदयरोग तज्ञ डॉ.ज्योत्स्ना पाटील
समीर घोडेकर, भोर तालुका.
भोर: जागतिक योग दिनानिमित्त भोर पंचायत समिती हॉल येथे आयोजित आरोग्य विषयक कार्यक्रमात हृदयरोगतज्ञ डॉ. जोत्स्ना पाटील यांनी योगविषयक तसेच आरोग्यविषयक मोलाची माहिती सादर केली यावेळी भोर तालुक्यातून अनेक युवकांनी, ज्येष्ट नागरिक, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
२१ जून हा दिवस संपूर्ण विश्वभरात योग दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी शरीर तसेच स्वस्थ मना साठी योग अतिशय आवश्यक आहे. दर रोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. सन् २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
आपल्याला रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते,योगामुळे आपण मोठ-मोठ्या आजारावर मात करू शकतो, तसेच मानसिक ताण-तणाव सुदधा दूर करू शकतो. शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम करण्यासाठी योगासन हे रामबाण उपाय आहे.
शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते. सन् २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
भारतीय संस्कृती मध्ये योगाला खूप महत्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यमातुन आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो. आपल्याला रोजच्या जीवनात दैनंदिन कार्य करण्यासाठी स्वस्थ शरीराची गरज असते. योगामुळे आपण मोठ-मोठ्या आजारावर मात करू शकतो तसेच मानसिक ताण-तणाव सुध्दा दूर करू शकतो. अशा प्रकारे उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी डॉ. ज्योत्स्ना पाटील यांचे आभार मानले.
या कार्यक्रमांमध्ये भोर पंचायत समिती, भारतीय विद्याधाम भोर,एम के फिटनेस क्लब भोर, निमा डॉक्टर्स असोसिएशन भोर, केमिस्ट्री असोसिएशन भोर, रोटरी क्लब भोर यांनी सहभाग घेतला होता.




