प.पू.महास्थवीर अजाहन जयासरो (अरण्यवास परंपरा थाईलैंड) आणि थाई भिक्षु संघ भारत भेटीमध्ये भोरच्या दीक्षाभूमीतील धम्मदेसनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
भोर : दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठान, भोर-पुणे, दीक्षाभूमी स्मारक समिती भोर, भोर तालुका बोलूजन संघ, भोर, सम्राटांचा सम्राट ग्रुप भोर तालुका, करुणादिप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प.पू. महास्थवीर अजाहन जयासरो (अरण्यवास परंपरा थाईलैंड) आणि थाई भिक्षु संघ भारत भेटीस येत असून शनिवार दि. २८/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता. स्थळः दीक्षाभूमी स्मारक समिती, भोर येथे धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे,
कार्यक्रम रूपरेषा पुढीप्रमाणे असेल
शनिवार दि. २८/१२/२०२४
दुपारी १२.३० वा. समारोप
सकाळी ६.०० वा. मौजे नन्हे, ता. भोर भिक्षु संघाचे स्वागत येथुन पद यात्रा सुरुवात
सकाळी ६.३० वा. मौजे संगमनेर येथे भिक्षु संघाचे स्वागत
सकाळी ७.१५ वा. मौजे सांगवी येवली येथे भिक्षु संघाचे स्वागत
सकाळी ८.३० वा. मौजे भोलावडे येथे भिक्षु संघाचे स्वागत
सकाळी ९.०० वा. दीक्षाभूमी स्मारक समिती येथे आगमन
भोर तालुका बौद्ध उपासक उपासिका सर्व सामाजिक संघटना
यांच्या वतीने भिक्षु संघाचे स्वागत
सकाळी ९.१५ वा. भिक्षु संघास फल आहार
सकाळी १०.१५ वा. भोजन दान
सकाळी ११.०० वा. धम्मदेसना (प्रवचन)
दुपारी १२.३० वा. भोर ते पसुरे पदयात्रेस सुरुवात
दुपारी ०१.०० वा. बसरापूर येथे भिक्षु संघाचे स्वागत
दुपारी १.४० मि. बारे येथे भिक्षु संघाचे स्वागत
दुपारी २.२० मि. म्हाळवडी येथे भिक्षु संघाचे स्वागत
दुपारी २.४० मि. कर्नवडी येथे भिक्षु संघाचे स्वागत
दुपारी ३.५० मि. मौजे पहुरे येथे भिक्षु संघाचे स्वागत
शेवट पदयात्रा समात होईल.
निमंत्रक
भारतीय बोतु महासभा भोर तालुका, दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठान भोर, पुणे दीक्षाभूमी न्मारक समिती भोर, बॉयुजन संघ भोर तालुका, सम्राटांचा सम्राट ग्रुप भोर तालुका, करुणादीय फाउंडेशन भोर.
भोर तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी वा सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, बहुसंख्येने उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी. टिप: सर्व उपासक उपासिकांनी येताना शुभ्र वस्त्र परिधान करून येणे, ज्यांना भिक्षु संघास भोजनदान, फलआहार, वस्तू, स्वरूपात काही दान द्यायचे असेल, तर प्रत्यक्ष हजर राहून भिक्षु संघास दान द्यावे.
भोर, राजगड, मुळशी , पुरंदर , खंडाळा तालुक्यातील बौद्ध उपासक उपासिकांनी थाईलैंड भिक्षु संघाचे स्वागत करण्यासाठी व धम्मदेसनेचा कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी असे आव्हान सतीश गायकवाड यांनी केली आहे.
बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपले योगदान बहुमूल्य आहे.




