ताज्या घडामोडी

बारामतीत शरद पवारांची ग्रेट भेट ! भोर तालुक्यातील गावरान फळांचा वानवळा दिपावली भेट म्हणून प्रदान


बारामतीत थोर नेत्यांना भेट भोर तालुक्यातील गावरान फळांचा वानवळा दिपावली भेट म्हणून प्रदान

बारामती : दिपावलीच्या शुभसंध्येला बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, देशाचे मार्गदर्शक आणि पद्मविभूषण मा. शरदचंद्रजी पवार साहेब तसेच संसद महारत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांना भेटून दिपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या भेटी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या नियोजनावर तसेच भोर तालुक्यातील शेती विकास, फळबाग योजना, आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर साहेबांशी विस्तृत चर्चा झाली. सुप्रियाताई सुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी काळात जनतेशी जोडून विकासाच्या वाटचालीस हातभार लावण्याचे आवाहन केले, या भेटीचे वैशिष्ट्य म्हणजे भोर तालुक्यातील सुप्रसिद्ध गावरान फळांचा “वानवळा” हा दिपावलीचा विशेष भेटवस्तू म्हणून साहेबांना सादर करण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकरी उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम असल्याने सर्वत्र कौतुकाची लाट उसळली.

Advertisement

स्वराज महाराष्ट्र न्युजशी बोलतांना गणेश खुटवड सांगत होते की आज आपण अशा व्यक्तिमत्त्वासमोर उभे आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला, शरद पवार हे केवळ एक नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या विचारांचा आणि प्रगतीच्या ध्यासाचा प्रतीक आहेत, त्यांचं कार्य, त्यांची दृष्टी आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र आज सशक्त आणि आत्मनिर्भर उभा आहे. कारण “विठ्ठल” बारामतीत असला तरी त्याचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. गणेश खुटवड यांनी केलेली ही स्तुती  संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करणारी आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेशभैय्या खुटवड, किसान सेलचे अध्यक्ष शिवाजी वाडकर, गणेश गोसावी, ओंकार गोसावी, निलेश भोरडे, जालिंदर खुटवड, धनंजय खुटवड, राजेंद्र खुटवड तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.भोर तालुक्यातून बारामती येथे गेलेल्या या शिष्टमंडळाच्या भेटीने दिवाळी पर्वाला सामाजिक एकात्मतेची आणि राजकीय समन्वयाची नवीन झळाळी प्राप्त झाली आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!