ताज्या घडामोडी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा मंदार देसाई कुटुंबीयांकडून महानैवेद्य


पुणे : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित आंबा महोत्सवात रविवारी ११ हजार आंब्यांचा भव्य महानैवेद्य अर्पण करण्यात आला. भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.मंदिरात रविवारी पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक पार पडला.

Advertisement

प्रसिद्ध गायिका मंजूषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी आठ वाजता गणेशयाग झाला. आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबीयांनी हा नैवेद्य दान केला.

आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, वृद्धाश्रम, दिव्यांग संस्था तसेच मंदिरातील भाविकांना वाटप करण्यात येणार आहे. या महानैवेद्याने भक्तीभाव अधिक गडद झाला असून, ट्रस्टकडून दरवर्षी अशा विशेष सोहळ्यांचे आयोजन केले जाते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!