ताज्या घडामोडी

न्हावी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींचे राज्यस्तरीय मंथन स्पर्धेत दमदार यश


सारोळा : भोर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा न्हावी येथील इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी कु. जिज्ञासा प्रवीण सोनवणे हिने राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान स्पर्धेत १५० पैकी १३२ गुण मिळवून महाराष्ट्रात दहावा व पुणे जिल्ह्यात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तसेच, इयत्ता पहिलीतील कु. अनन्या प्रमोद सोनवणे हिने १३० गुणांसह राज्यात अकरावा व जिल्ह्यात सहावा क्रमांक साकडला. या अभिमानास्पद यशाने शाळेचा नावलौकिक उंचावला असून सर्वत्र कौतुक होत आहे.

जिज्ञासाच्या यशामागे आई-वडील व वर्गशिक्षिका श्रीम. रुपाली पिसाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर अनन्याचे यश आई-वडील व वर्गशिक्षक अनिल चाचर यांच्या प्रोत्साहनाने शक्य झाले. या यशाने शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

Advertisement

या दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, गटशिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे, विस्तार अधिकारी सचिन लोखंडे व शेख हुमेरापरवीन, न्यू इंग्लिश स्कूल न्हावीचे मुख्याध्यापक संजय कांबळे, ग्रामपंचायत न्हावी ३२२ च्या सरपंच शीतल सोनवणे, न्हावी १५ चे सरपंच भरत सोनवणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका ललिता भोसले तसेच पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी केले. भविष्यात शाळेत आणखी मोठे यश मिळेल, असा विश्वास आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!