ताज्या घडामोडी

भाटघर शाखा अंतर्गत येणाऱ्या मळे गावातील वीज पुरवठा पूर्ववत ! मुसळधार पावसात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे कनिष्ठ अभियंता दिपाली खवणे यांच्याकडून कौतुक


 

भाटघर : सर्वांसाठी पावसाळा आवडीचा असला तरी पाऊस मात्र प्रत्येकाची दैनाच उडवत असतो, भोर तालुक्यातील भाटघर शाखे अंतर्गत येणाऱ्या मळे गावातील तांत्रिक बिघाड झालेल्या रोहित्र महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अनेक अडचणीचा सामना करत मुसळधार पावसामध्ये रोहित्र बदलुन खंडित झालेला वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला असल्याने स्थानिक नागरिकाकडून त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे,

Advertisement

वीज यंत्रणेसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एक ओवी तंतोतंत लागू होते. ते म्हणतात ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. वीज कर्मचाऱ्यांसाठी पाऊस एका युद्धाच्या प्रसंगा पेक्षा कमी नसतो, दहा-पंधरा मिनिटाच्या वादळी पावसात होत्याचं नव्हतं होतं असते.पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने तो पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले जाते.काही ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, काही ठिकाणी वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी भूमिगत केबल्स वापरण्याचा विचार केला जात आहे.

सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीचे काम केले जात आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे वीजपुरवठा वेळेत पूर्ववत केला आहे.नागरिकांनी वीज पुरवठा खंडित झाल्यास थोडा धीर धरावा आणि दुरुस्तीच्या कामात सहकार्य करावे असे आव्हान दिपाली  खवणे मॅडम,कनिष्ठ अभियंता भाटघर शाखा यांनी केले आहे.

 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!