क्राईम

फलटणमध्ये उसाच्या शेतात महिलेचा अर्धवट मृतदेह ; अंधश्रद्धेतुन हत्या झाल्याचा संशय


 

फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शुक्रवारी 18 जानेवारी 2025 एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, फलटण तालुक्यातील विडनी गावातील उसाच्या शेतामध्ये अंधश्रद्धेमुळे एका महिलेची हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज असून या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अंद्धश्रद्धेतून हत्या झाल्याच्या संशय असुन ऊसाच्या शेतात महिलेचे शीर धडा पासुन वेगळे करून शेजारी एका कापडावर हळदी कुंकू, काळी बाहुली आणि महिलेचे केस सापडल्यामुळे परिसरात अघोरी प्रकारातून खून केल्याची चर्चा आहे,

8:14.

5G+

= Menu

स्थैर्य

फलटण |

विडणी (ता. फलटण) परिसरातील २५ फाटा येथील उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचा अर्धवट अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाजवळ उसाच्या शेतात गुलाल, कुंकू, दिव्याची वात, नारळ, काळी बाहुली आढळून आल्याने हा नरबळी दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारामुळे फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Advertisement

फलटण तालुक्यातील विडणी येथील 25 फाटा परिसरात प्रदीप जाधव या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट व सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या मृतदेहाच्या शेजारी जादूटोणा व पुजेचे साहित्य व काळी बाहुली त्यांना दिसली. या घटनेची माहिती जाधव यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. हा मृतदेह जंगली प्राण्यांनी उसातून बाहेर काढला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मृतदेहा जवळ नारळ, गुलाल, व याच मृत महिलेचे कापलेले केस व तेलाचा दिवा सापडला. त्यामुळे या माहीलेच नरबळी दिला असावा असा देखील अंदाज वर्तवला जात असुन महिलेचा गायब असलेला शरीराचा अर्धवट भाग कोठे असेल याचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!