महायुतीत भोर मतदार संघ कोणाकडे जाणार उत्सुकता शिगेला
सुनिल सावंत, भोर प्रतिनिधी.
भोर मतदासंघामध्ये काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी निवडणुकीपूर्वी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले तेव्हा पासून प्रचाराचा धडाका लावत आमदार संग्राम थोपटे यांनी आज तरी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये हा मतदारसंघ कोणाकडे जातोय हे निश्चित न झाल्यामुळे महायुती मधून कोण उमेदवार असणार याबाबत अजूनही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
भोर विधानसभेची जागा महायुतीच्या भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांकडून कोण लढणार याबाबत अनेक उमेदवारांकडून दावे प्रतिदावे होत आहेत.
विद्यमान आमदारांचे कुटुंब, त्यांचे नातेवाईक, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक ही निवडणूक जिंकण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे, निवडणूक जाहीर होण्याअगोदरच प्रत्येक मतदाराच्या घरोघरी जाऊन त्यांनी गाठीभेटी घेतल्या असून त्यांच्या प्रचाराच्या एक फेरी पूर्ण होऊन दुसरी फेरी पूर्ण होण्याच्या तयारीत आहे.
शिवसेना (ठाकरे गट) शंकर मांडेकर हे निवडणुकीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचले आहेत, त्यांनी होम मिनिस्टर, महिला भगिनी कार्यक्रम घेतले असुन प्रचार चालु आहे, ही जागा काँग्रेसला सुटली तर ते सांगली पॅटर्न राबवून अपक्ष लढणार का ? हे ही पाहवे लागेल.
भाजपकडून किरण दगडे पाटील, शरद ढमाले, जीवन कोंडे हे इच्छुक आहेत त्यामध्ये किरण दगडे पाटलांनी भोर विधानसभा मतदार संघात काशी यात्रा, दिवाळी फराळ साहित्य वाटप, होम मिनिस्टर, गंगा पूजन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून घरा घरात पोहोचले असून भाजपला जागा न मिळाल्यास त्याबाबतचा निर्णय गुलदस्त्यात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) रणजीत शिवतरे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषवताना भोर विधानसभा मतदारसंघात उल्लेखनीय कामगिरी केलेले आहे, त्यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत विधमान आमदारांचा पराभव केलेला आहे, कोण म्हणतं पडणार नाय, आमच्या शिवाय ते घडणार नाय असे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत, वीसगाव-चाळीसगाव खोऱ्यामध्ये विकास कामाच्या माध्यमातुन चांगली पकड आहे, त्यांच्या कामाचा झंजावात पाहता महायुतीमध्ये त्यांना संधी मिळते का पाहावे लागेल.
शिवसेना (ठाकरे गट) बाळासाहेब चांदेरे इच्छुक असून ते दिव्यांग कल्याण संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे दिसते, दिव्यागांशी त्यांचे भावनिक नाते आहे, अल्पवधीतच मुख्यमंत्र्यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे, मुख्यमत्री लाडकी बहीण योजनेची जन-जागृती, महीला भगिनी करिता करता विविध कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी प्रचार चालू केला आहे, त्यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास काय निर्णय घेतात कळेलच. दुसरे उमेदवार कुलदीप कोंडे हे गेली 10 वर्षाहून जास्त काळ लोकांच्या संपर्कात आहेत ही त्यांची जमेची बाजु असुन त्यांनी 2 वेळा भोर विधानसभा निवडणुक विद्यमान आमदारांच्या विरोधात लढवलेली आहे, 2 वेळेस त्यांना अपयश आले होते, तिसऱ्यांदा शिवसेना (शिंदे गट) त्यांना उमेदवारी देतायत का किंवा उमेदवारी दिली तर यावेळी ते काही चमत्कार करू शकतात का पाहावे लागेल.
त्यामुळे आज तरी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे एकमेव उमेदवार विधानसभेच्या आखाड्यात उभे ठाकले असून त्यांच्या तोडीचा पैलवान महायुती कधी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच महायुतीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो याकडे भोर विधानसभेतील मतदारांच्या नाजरा लागलेल्या आहेत.




