ताज्या घडामोडी

भाजपची ताकद वाढली ! नीता इंगुळकर यांच्या उमेदवारीला कामथडी गावचा पूर्ण पाठिंबा


नसरापूर : कामथडी गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने इच्छुक उमेदवार म्हणून सौ. नीता धनंजय इंगुळकर यांच्या उमेदवारीला कामथडीतील ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात कामथडी येथे झालेल्या गाव बैठकीत गावांतील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकमताने नीता इंगुळकर यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली.

Advertisement

या बैठकीत बोलताना उपस्थित मान्यवरांनी सांगितले, की नीता इंगुळकर यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यात त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. कामथडी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सक्षम नेतृत्व ठरतील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. “एक गाव एक उमेदवार” या भूमिकेवर सर्वांचे एकमत झाले आहे.

या निर्णयामुळे भाजपची संघटनात्मक ताकद कामथडी गणात अधिक मजबूत झाली आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीत नीता इंगुळकर यांच्या विजयासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार केला. या एकजुटीमुळे गणातील विकासकामांना गती मिळणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!