ताज्या घडामोडी

भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायती पोटनिवडणूक जाहीर ! २८ एप्रिलला मतदान तर २९ एप्रिलला निकाल


भोर : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात निवडणुकीचा धुरळा पुन्हा उडणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर आता २६ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.

भोर तालुक्यातील रिक्त पदांमुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. काही सरपंच व सदस्यांचे निधन, राजीनामा किंवा इतर कारणांमुळे ही पदे रिक्त झाली होती. जिल्हा प्रशासनाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, २८ एप्रिलला मतदान होईल. निकाल २९ एप्रिलला जाहीर होणार आहे.

Advertisement

निवडणूक प्रक्रिया पारदर्शकतेने राबवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तयारी सुरू झाली असून, ग्रामस्थांमध्ये उत्साह आहे. या निवडणुकीमुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक गतीमान होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालु केला जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!