क्राईम

वेळू पंचायत समिती गणात काँग्रेस उमेदवार रोहिदास कोंडे यांना मतदारांची पसंती


शिवापूर : पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रोहिदास कोंडे यांना मतदारांची पहिली पसंती मिळत आहे. सुशिक्षित, बिन आईवडीलचा मुलगा असलेले कोंडे यांचा सामाजिक सेवाभाव आणि विश्वासार्ह वाटचाल मतदारांना भुरळ घालत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

रोहिदास कोंडे हे केवळ राजकीय उमेदवार नसून सामाजिक कार्यकर्ते आहेत. संस्कार, संयम आणि सेवाभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सोनेरी पैलू आहेत. लोकांशी आदराने बोलणे, त्यांचे बोल ऐकून घेणे आणि प्रत्यक्ष कृतीने समस्या सोडवणे ही त्यांची कार्यपद्धती आहे.

Advertisement

शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, सामाजिक प्रश्न आणि सामान्य माणसांच्या गरजांना प्राधान्य देऊन त्यांनी अनेक वर्षे समर्पित सेवा केली आहे.जनतेसाठी काम हे केवळ जबाबदारी नसून मनापासून जपलेले नाते आहे, असा विश्वास कोंडे यांनी मतदारांच्या मनात बिंबवला आहे.

या निवडणुकीत त्यांचा हा सेवाभाव मतदारांना मान्य झाला असून, लोकांचा विश्वास त्यांच्या कामाशी घट्ट जोडला गेला आहे. कामातून ओळख घडते आणि विश्वास टिकतो, हा त्यांचा मंत्र प्रत्यक्षात त्यांना या निवडणुकीसाठी फायदेशीर ठरत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!