राजकीय

एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून बनेश्वराला शिवसैनिकांचे साकडे


नसरापूर : राज्यामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाले असून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावा याकरिता श्री क्षेत्र बनेश्वर या ठिकाणी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, शिवसेना भोर तालुका अध्यक्ष अमोल पांगारे यांच्याबरोबर शेकडो शिवसैनिकांनी बनेश्वराला दुग्धाभिषेक, आरती, महापूजा करून एकनाथ शिंदे चे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून साकडे घालण्यात आले.

Advertisement

महायुतीमध्ये भाजप पक्षाच्या सर्वात जास्त जागा आल्याने त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी आग्रही मागणी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे तसेच महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या असुन महायुतीला 230 जागा निवडून आल्या, भोर तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्तेनी बनेश्वर येथे एकत्रित येऊन एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत म्हणून पुजा  केली.

यावेळी मंगेश तनपुरे,राहुल पांगारे,चेतन पांगारे, राहुल मिसाळ, अमित गुरव,अजिंक्य पांगारे, प्रसन्न घयावळ तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!