भोर तालुक्यात गारपीटीनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी दौरा ! पंचनामा लवकर करून भरपाईचे आश्वासन
भोर : दि. २ (गुरुवार) भोर तालुक्यातील वडगाव डाळ आणि परिसरात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीटी व अवकाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय श्री. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली.
राज्यात आतापर्यंत तीन लाख पाच हजार एकर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरा असे सांगून शासनाने लवकरच पंचनामा करून योग्य आर्थिक मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांत्वन करताना त्यांनी शेतमालाचे मूल्यमापन तात्काळ करण्याचे निर्देश दिले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, भोर पंचायत समिती सभापती मनीषा कंक, भोर नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र युवक सरचटणीस स्वप्निल कोंडे, सुधीर कोंडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष राजेश खोपडे,मंदार वीर व ग्रामस्थ उपस्थित होते.




