ताज्या घडामोडी

कापूरहोळ परिसरात दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट


कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ गावात रात्रीच्या काळोखाचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने अभिजीत रामदास बिंदे वय वर्ष ३२, रा. कापूरहोळ यांच्या घरासमोरून होंडा एक्टिव्हा मोटारसायकल चोरीस गेली असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

अभिजीत बिंदे यांच्या मते, २६ मार्च रात्री ८ वाजता ते २७ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंतच्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीचा ईरादा धरीत मोटारसायकल चोरून नेली. मोटरसाकलचा नोंद क्र. MH 12 NT 3658 असा असुन राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. १३२/२०२६, BNS कलम ३०३ (२) अंतर्गत चोरट्या विरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अधिकारी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पो.हवा. गुंडगे (८९०) तर तपासी अंमलदार पो.हवा. कोल्हे (१८६०) यांच्याकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला असून, वाहने लावण्याच्या ठिकाणी रात्री उजेड ठेवावा व संशयित व्यक्तींची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!