ताज्या घडामोडी

बेपत्ता युवक विहिरीत मृत अवस्थेत सापडला ! निवी गावात शोककळा


वेल्हे :  निवी ता. राजगड येथील २० वर्षीय युवक सचिन पांडुरंग कचरे याचा विहिरीत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. आज सकाळपासून घरातून बेपत्ता असलेल्या सचिनचा शोध घेत असताना घराजवळील विहिरीपाशी त्याच्या चपला सापडल्या. यामुळे नातेवाईक आणि मित्रांमध्ये संशय निर्माण झाला.

Advertisement

या घटनेबाबत नातेवाईकांकडून वेल्हे पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला बोलावले. सुमारे एक तासांच्या शोधमोहिमेनंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. हवेली आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे अध्यक्ष तानाजी भोसले व त्यांच्या पथकाने तत्परतेने मदत केली.

या घटनेची माहिती पसरताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. निवी गावकऱ्यांमध्ये शोकाची लाट पसरली असून युवकाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून घटनेचा पुढील तपास वेल्हे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!