नसरापूर येथील घरफोडीत ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर येथे जानकी मंगल कार्यालयाच्या मागील घरात चोरट्याने कडी-कोयंडा तोडून घरफोडी केली. संतोष शंकर विंचूरकर (३७, रा. नसरापूर) हे बाहेरगावी गेल्यावर ही घटना घडली. चोरट्याने लोखंडी कपाटातील लॉकर उघडून सोन्याची कर्णफुले, वेल व अंगठी असा सुमारे एक तोळा, ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
बाहेगावाहुन विंचूरकर कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना घराची कडी तुटल्याली अवस्थेत होती घरात चोरी झाल्याचे आढळताच त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. तत्परचा दाखवत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, स्थानिकांकडून चौकशी आणि पथक कार्यवाही सुरू आहे.
बाजारपेठेच्या गावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी घरमालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.




