क्राईम

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल 85% उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


 

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुक लढवणारे 4136 उमेदवारा पैकी 3515 उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त झाली असुन निवडणूक लढविणऱ्या 85 टक्के उमेदवारांचे निवडणूक आयोगाकडे एकूण 3.5 कोटींची डिपॉझिट रक्कम जमा झाली आहे.

मतदार संघात निवडणुक लढवत असताना प्रत्येक उमेदवाराला 10 हजाराचे डिपॉझिट रक्कम भरणे बंधनकारक असते, झालेल्या एकुण मतदानापैकी 1/6 पेक्षा कमी मते घेणाऱ्या उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त होते, अनुसुचित जाती-जमातींच्या उमेदवारांसाठी हे डिपॉझिट 5 हजार रुपये इतकं असते.

Advertisement

महाविकास आघाडीच्या एकूण 22 उमेदवारांचा दारुण पराभव झाला असून त्यांचे डिपॉझिट रक्कम जप्त झाली आहे. काँग्रेसचे 9, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 8,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे 3, तर शेकापच्या 2 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. महायुती मधिल घटक पक्षांचे शिवसेना शिंदे गटाचा 1 उमेदवार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे 5 उमेदवारांचे डिपॉझिट रक्कम जप्त होण्याची नामुष्की त्यांच्यावर वाढवली आहे.

या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे आणि वंचितच्या उमेदवारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एकाही उमेदवाराचे डिपॉझिट रक्कम जप्त झालेली नाही.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!