राजकीय

संग्राम थोपटेंच्या पराभवासाठी महायुतीचा एकजुटीचा नारा


भोर : दि. 21 /10/24 (सोमवार) शिवरे येथे महायुतीची पत्रकार परीषद पार पडली यामध्ये महायुतीच्या सर्व नेते मंडळींनी निश्चय केला की उमेदवारी कोणालाही मिळो सर्वजण मिळुन महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार आहेत.

  • जीवन कोंडे : एकाच कुटुंबाची गेले 47 वर्षे सत्ता असल्यामुळे मोर्चा विकासाला खेळपट्टी आहे खेळ दुरुस्ती करण्याचे काम महायुती म्हणून आम्ही नेतेमंडळी करणार आहोत गड किल्ले संवर्धन, रोजगाराचा प्रश्न रस्ते पर्यटन धरणग्रस्तांच्या प्रश्न या सर्व कामावर आमदार अपयशी झाले आहेत, यावेळी 1999 सालच्या विधानसभा निकालाची पुनरावृत्ती होईल.
  • रणजीत शिवतरे : काही लोकांनी मतदार संघात साधा रुमाल वाटला नाही, त्यांना सध्या साड्या वाटप कराव्या लागत आहेत, स्वतःच्या हिताच्या खोट्या बातम्या छापून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र भोर विधानसभा मतदार संघात काहीही बदल झाला नसून गेली 15 वर्षात पर्यटन, रस्ते, एमआयडीसी, राजगड कारखाना, याबाबतीत अपयशी झाले आहेत, एखाद्या कामाचे क्रेडिट घेतात परंतु ते काम चांगल्या प्रकारे झालेले आहे का नाही त्याच्यामध्ये क्वालिटी आहे का असं काही पाहत नाही, फक्त त्यांच्या जवळच्या ठेकेदाराचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे पाहतात, आम्ही महायुती म्हणून एक संघ आहोत महायुतीचा उमेदवार जास्तीत- जास्त मतांनी निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार.
  • कुलदीप कोंडे : बोलावे त्याच्या विषयी शब्द ही पडतील आपरे, आणि लिहावे त्याच्या विषयी शब्दही असतील बापुडे. आत्ता विद्यमान आमदारांची पराभवाच्या भीतीने जी धडपड चालू आहे, ती धडपड या अगोदर कधी दिसली नाही अशीच धडपड विकास कामा बाबतीत केली असती तर आज चित्र वेगळे दिसले असते, सर्वसामान्यांना या ठिकाणी बदल हवा आहे,एकीकडे आमदार म्हणतात विकास कामाला निधी मिळत नाही अशी तक्रार करतात आणि दुसरीकडे त्याच मंजूर झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. ते सध्या लोकांची फक्त दिशाभूल करत आहेत. आम्ही यावेळी महायुतीच्या माध्यमातून त्यांचा पराभव निश्चित करू
  • शरद ढमाले : भोर-राजगड तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची मूर्तमेड रोवली असल्याचा इतिहास असताना येथील जनता बदल का करू शकत नाही,भोर मधील परिस्थिती आजही जैसी के तैशी आहे, प्रकल्पग्रस्तांचे दुःख, शेतकऱ्यांची व्यथा, तरुणांकरिता रोजगार निर्मिती असो, एमआयडीसी बाबत खोटी आश्वासने, कारखान्याला ऊस घालणारे शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या तुलनेत 800 रुपये कमी दिले जातात, आमदार विकासाबाबत अपयशी झाले आहेत, महायुती म्हणून आम्ही सर्व जण एक संघ आहोत महायुतीचे वरिष्ठ नेते मंडळी जो उमेदवार देतील त्याचे आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार आहोत.
  • सुनील गायकवाड : प्रस्थापित्तांना झुगारून एकत्र आल्यास महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे, सद्यस्थितीत रिपब्लिकन पक्ष प्रमुख रामदास आठवले भारतीय जनता पार्टी बरोबर केंद्रात सत्तेत सहभागी आहेत, भोर तालुका रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्याकरिता प्रयत्न करणार आहे.
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!