क्राईम

भोरच्या जांभळी येथिल हॉटेलमध्ये झोपलेल्या ७५ वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या ! मोबाईल विवादातून हॉटेल कामगाराचे कृत्य !!


नसरापूर : भोर तालुक्यातील जांभळी गावाजवळील नसरापूर-वेल्हा रोड कडेला असलेल्या ‘शेतकरी व्हेज नॉनव्हेज’ हॉटेलमध्ये २४ मार्च रात्री ११ ते २५ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत धक्कादायक घटना घडली. हॉटेल मालक अनिल सखाराम रसाळ (४८, रा. जांभळी) यांच्या सासरे किसन बापू सुर्वे (वय वर्ष ७५ ) सध्या राहणार जांभळी, मुळगाव भोंगवली ता. भोर यांचा बोथट हत्याराने डोक्यात मारून निघृण खून झाल्याचा संशय आहे.

Advertisement

फिर्यादीनुसार, मयत सुर्वे हे अनेक वर्षांपासून हॉटेल शेजारी टपरी चालवत. हॉटेल बंद झाल्यावर नियमित तेथेच झोपत असत. रात्री हॉटेल कामगार सागर थापा (पूर्ण नाव-पत्ता माहीत नाही) याने त्यांना मोबाईल न दिल्याबद्दल रागावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सकाळी अनिल रसाळ यांना घटना उघड झाली. त्यांच्या फिर्यादीवरून (मो. ९५७९८८७४५२) राजगड पोलीस स्टेशन गु.र.नं. १२६/२०२६, BNS कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल (२५/३/२०२६, १७.५५ वा., स्टे.डा. ०३५/२०२६).
राजगड पोलीस स्टेशनचे दाखल अधिकारी म.पो.ना. इंगळे (३०७), तपासी अधिकारी स.पो.नि. राठोड, प्रभारी पो.नि. गवळी सो. यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

तसेच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर (भोर विभाग, सासवड) यांनी पाहणी करून या घटनेबाबत इतर सहकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पोलिसांनी विशेष पथके रवाना करून आरोपी सागरचा शोध सुरू केला आहे. पूर्वनियोजित हत्या की वादातून घडली याचा तपास जोरदार चालू आहे. जांभळी परिसरात भीती पसरली असून असुन स्थानिकांकडून आरोपीला अटक करण्याची मागणी होत आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!