ताज्या घडामोडी

भोर पंचायत समितीत राष्ट्रवादीची ताकद वाढली ! तृप्ती खुटवड यांची गटनेतेपदी नियुक्ती


भोर : भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार सदस्य निवडून आले असून, गटनेतेपदी तृप्ती खुटवड यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून, भाजपाकडेही समान चार सदस्य आहेत.

भोर पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार सदस्य विजयी झाले. पक्षांतर्गत निवडी प्रक्रियेत तृप्ती खुटवड यांना गटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तृप्ती खुटवड या स्थानिक राजकारणातील अनुभवी म्हणून ओळखल्या जातात. त्यांना प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव लाभला आहे.

स्थानिक संस्थांमध्ये व पुणे जिल्हा परिषद मध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असून, ग्रामविकास, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.या निवडीमुळे भोर पंचायत समितीत राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात समान बलाबल राहिले आहे.

Advertisement

स्वर्गीय आमदार काशिनाथराव खुटवड यांच्या त्या सुनबाई आहेत, पुणे जिल्हा परिषद सदस्य विक्रमदादा खुटवड यांच्या पत्नी असुन त्यांना राजकीय वारसा लाभला असून तृप्ती खुटवड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडून विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

तृप्ती खुटवड म्हणाल्या, “मी सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन. पंचायत समितीच्या प्रत्येक गावापर्यंत योजना पोहोचवण्यावर भर देईन.” भोर तालुक्यातील नागरिकांकडून या निवडीचे स्वागत होत असून, येत्या काळात विकासाच्या विविध योजनांना वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सभापती व उपसभापतिपदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. लवकरच सभापतिपदासाठी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!