ताज्या घडामोडी

डॉ.मंदार माळींकडून सांगवी येथे घरीच यशस्वी डिलीवरी ! आई-बाळ दोघेही सुखरूप


डॉ.मंदार माळींकडून सांगवी येथे घरीच यशस्वी डिलीवरी ! आई-बाळ सुखरूप

भोर : डॉ. मंदार माळी यांच्या नेतृत्वाखालील १०८ अत्यवश्यक सेवा पथकाने असाधारण सावधगिरी बाळगून तब्बल ४० किलोमीटर अंतरावरील सांगवी गावात घरीच डिलीवरी करून आई आणि बाळ दोघांना सुखरूप वाचवले. प्रसंगाची तीव्रता ओळखून पायलट विशाल कदम यांच्या सहकार्याने नातेवाईकांच्या उपस्थितीत ही डिलीवरी यशस्वी झाली.

Advertisement

डॉ. मंदार माळी यांनी सांगितले, “वेळेचा प्रसंग लक्षात घेता रुग्णालयापर्यंत पोहोचण्याऐवजी घरीच सुरक्षित डिलीवरीचा निर्णय घेतला. आई आणि नवजात बाळ दोघेही सक्षम आहेत.” डिलीवरीनंतर दोघांना भोर ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी सोडण्यात आले.

नातेवाईकांनी १०८ सेवेचे, बीव्हीजी डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉ. प्रियांका जावळे, एडीएम सुजित पाटील, डॉ. मंदार माळी आणि पायलट विशाल कदम यांचे मनःपूर्वक आभार मानले. ही घटना ग्रामीण भागातील १०८ सेवेच्या तत्परतेचा उत्तम नमुना आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!